Friday, June 20, 2025

Buy now

spot_img

निरवडे येथे ‘विकासगंगा’ आणि ‘शिवतारे’ बालसभांची स्थापना.! ; परी ग्राम संघ पीआरआय – सीबीओ अभिसरण प्रकल्पांतर्गत उमेद अभियानाचा उपक्रम.

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथे पी आर आय – सी बी ओ अभिसरण प्रकल्पांतर्गत उमेद अभियानाचा अनमोल प्रभाग संघ तळवडेमधील परिग्राम संघ व ग्रामपंचायत यांच्या वतीने ‘विकासगंगा’ आणि ‘शिवतारे’ अशा दोन बालसभांची स्थापना करण्यात आली. दिनांक 22 फेब्रुवारी 2025 निरवडे येथे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तळवडे प्रभाग संघातील परिग्राम संघ व निरवडे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने निरवडे येथे वय 6 ते 18 वयोगटातील मुलांची बालसभा स्थापन करण्यात आली. मुलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना असणाऱ्या समस्या, आवश्यक असणाऱ्या सुख-सोयी उपलब्ध करणे, विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे, जेणेकरून मुलं मोबाईलपासून दूर राहतील, अशा उद्देशाने पुढे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या बाल सभेच्या निमित्ताने बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मुलांना ग्रामपंचायत समूह ग्राम संघ, प्रभाग संघ यांची रचना प्रात्यक्षिकासह समजून घेता येईल.अशा प्रकारे निरवडे ग्रामपंचायत कार्यालय येथे ‘विकास गंगा’ आणि ‘शिवतारे’ अशा दोन बालसभा स्थापन करण्यात आल्या. या बाल सभेचे अध्यक्ष कु. कावेरी गावडे, उपाध्यक्ष विठ्ठल गावडे, सचिव स्वरा गावडे, सहसचिव दिवेश जाधव, कोषाध्यक्ष मयुरेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी निरवडे ग्रामपंचायत सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच श्री अर्जुन पेडणेकर, ग्रामसेवक श्री. राणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंदी पवार, प्राथमिक शाळा निरवडे मुख्याध्यापिका सौ. राणे मॅडम तसेच उपक्रमासाठी लाभलेले केरळ येथील कुटुंब श्री मेंटर गिरीजा मॅडम, प्रभाग संघ समन्वयक नाईक सर, डी आर पी श्रावणी वेठे, ग्रामसंघ पदाधिकारी, सचिव वैष्णवी गावडे, कोषाध्यक्ष रसिका पारकर, माजी अध्यक्ष निधी शिरोडकर, एलआरपी चैताली गावडे, आर्थिक समावेशन समिती राखी बागकर, प्राची शेटकर, सुप्रिया गावडे, सीआरपी समीक्षा जाधव, राधिका जाधव, अंगणवाडी सेविका, आशाताई तसेच उमेद मधील महिला सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमासाठी गिरीजा मॅडम, सरपंच सौ. गावडे मॅडम, नाईक सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बालसभेसाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम चालू करण्यासाठी निरवडे गावातील LRP व CRP म्हणून कार्यरत असणाऱ्या चैताली गावडे यांनी विशेष प्रयत्न केले.

ADVT – 

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles