मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्ग्जांना डावलल्याचे पाहायला मिळाले. तर यानंतर गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याचं बोललं जातं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून अनेकदा छगन भुजबळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी सवाल केला असता भुजबळ काही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जहाँ नहीं चैना वही नहीं असं तुम्ही म्हणालात, असा सवाल पत्रकारांनी केला असता ते म्हणाले – “मग मी काय करू? इकडेच राहायचं आहे ना…मला जे काही बोलायचं ते मी बोललो आहे. पुन्हा तेच-तेच दळण दळण्याची माझी इच्छा नाही.!” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
यावेळी छगन भुजबळांना नैतिकतेची व्याख्या काय? असा सवाल करत यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाकडून आज सभागृहात काही प्रश्न विचारण्यात आले आहेत असा सवाल छगन भुजबळांना विचारला असता त्यांनी स्पष्टच म्हटलं, “विरोधकांनी काही प्रश्न विचारले असतील तर त्यावर सरकार उत्तर देईल.”