मुंबई : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होत असलेल्या महाअधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर यांनी आज घेतला.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी माने यांच्याशी चर्चा केली.मुंबई दूरदर्शनचे अनेक गाजलेले उपक्रम जयू भाटकर यांच्या नावावर आहेत. आषाढी वारीचे थेट प्रक्षेपण, मराठी साहित्य संमेलन थेट प्रक्षेपण आदी सारखे अनेक उपक्रम भाटकर यांनी यशस्वी केलेले आहेत. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. कोकणात होत असलेल्या महाअधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी अनेक मौलिक सूचना केल्या.
डिजिटल मिडिया सावंतवाडी महाअधिवेशनासाठी पूर्वतयारी. ; दूरदर्शनचे माजी निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर यांच्याशी राजा मानेची चर्चा.
0
30