वैभववाडी : दिवंगत नेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडीत साजरी करण्यात आली.विद्यामंदिर कुंभवडे शाळा येथे वह्या वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार आपासून 28 जुलै पर्यंत वह्या वाटप, वृक्ष रोपण, अजितदादा शेतकरी सन्मान, रुग्णालय येथे फळ वाटप असे तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक अध्यक्ष संकेत सावंत, तालुका सचिव अमोल आमकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शशी मुद्रस, शैलेश साळवी, मोहन लसने, शाळा केंद्र प्रमुख गोसावी सर, चव्हाण सर, अनंत सुतार आदी उपस्तित होते.



