Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

सावधान..! – राज्यात उष्णतेची तीव्र लाट ; फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला.!

मुंबई : देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४० ते ४५ अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सध्या काही देश प्रखर उष्णतेची लाट अनुभवत आहेत. तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हात, पाय धुवू नका किंवा आंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा. त्यानंतरच अंघोळ करा, असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, असेही आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे.

राज्यात काही ठिकाणी कडक ऊन नसलं तरीही उष्ण लाटांनी नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे अनेकदा खूप उन्हातून आपण घरी येतो. अशावेळी शरीराला घाम आलेला असतो. शरीराचं तापमानही वाढलेले असतं, अशा वेळी आपण पटकन् थंड होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी थंड पाण्याने पाय धुणे, फॅनची स्पीड वाढवणे, कुलरसमोर बसणे, थंड पाणी पिणे, थंड पदार्थ खाणे अशा गोष्टी केल्या जातात. मात्र यामुळे उष्माघात होऊ शकतो. बाहेरून आल्यावर किमान अर्धातास या गोष्टी करणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

घराबाहेरचं तापमान जेव्हा 38 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते, तेव्हा घरी आल्यावर ताबडतोबत थंड पाणी पिऊ नये. आधी खोलीच्या तापमानाचंच पाणी प्यावं, तेसुद्धा अगदी हळू हळू, असा सल्ला डॉक्टर देतात. बाहेरच्या कडक उन्हातून आल्यावर थेट थंड पाण्याने हाय-पाय धुवू नका. अर्धा तास खोलीतल्या वातावरणातच तसेच बसा. नंतर हळूहळू साध्या पाण्याने पाय धुवा.

उष्माघातात शरीर जास्तीत जास्त तापमान शोषून घेते. शरीराचे तापमान जास्त वाढते तेव्हा स्ट्रोक म्हणजेच मेंदूची रक्तवाहिनी फुटते किंवा गुठळ्यांमुळे रक्तप्रवाह ब्लॉक होतात. उष्माघात झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळाले नाही तर मृत्यूची शक्यता जास्त असते, यासाठी उष्णतेच्या लाटेपासून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.

ADVT –

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles