सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिर येथे उद्या रविवार १३ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ (वेंगुर्ला) यांचा ‘पाताळकंद गणेश दर्शन’ हा पौराणिक ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
श्री कलेश्वर पूर्वी देवी कला क्रीडा मित्रमंडळ, गावडेवाडीच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात होमकुंडात अग्नी प्रज्वलित होणे, शिर नसलेली धडे भूमीवर पडणे, अक्राळविक्राळ प्राणी व पक्षी, पक्षी व प्राणी यांची शिरे मारुन मानवी धडाला चिटकवणे, पार्वती कोळ्यावर बसून दर्शन, रंगमंचावर पाण्यात अधांतरी होडी तरंगणे, अक्राळविक्राळ समुद्रराक्षस, मयुरावर विराजमान श्री गणेश दर्शन, जिवंत कोळ्यात समुद्र राक्षस गिळंकृत करणे, व्याघ्राने झाडाला मिठी मारताच झाड सुकुन जाणे, सुकलेले झाड पुन्हा पालवी फुटणे, समुद्र राक्षसाला मारुन कोळी जीवंत बाहेर येणे, कमळपुष्पात राजा विराजमान होताच त्या कमळाचा कंद तयार होणे, कंदावर विराजमान होवून गणेश मृत्यूलोकी आगमन आदी ट्रिकसीन दाखविण्यात आली आहेत. वेत्ये तसेच परिसरातील नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कलेश्वर पूर्वी देवी कला क्रीडा मित्रमंडळ, गावडेवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVT –


