Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

बाबासाहेबांच्या कष्टामुळेचं समाजातील प्रत्येकाला मिळतोय समताधारित न्याय! : संजू परब. ; ‘सिंधु आयडॉल’ स्पर्धेचे संजू परबांच्या हस्ते शानदार उद्घाटन!

सावंतवाडी: विश्वभूषण डॉ. बाबासाहेबांनी घटना लिहिताना कोणा एका समाजाचा विचार केला नाही. बाबासाहेब हे सर्वांचे होते म्हणून त्यांनी ते संविधान लिहिलं. अशा या महामानवाला माझं अभिवादन. या 75 वर्षात प्रत्येक घटकाला न्याय मिळतोय तो बाबासाहेबांनी घेतलेल्या कष्टामुळेच, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.

भिमगर्जना बौध्द मंडळ व समाज मंदिर मित्र मंडळ आयोजित सिंधु आयडॉल गायन व नृत्य स्पर्धेचे उद्घाटन श्री. परब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अॅड अनिल निरवडेकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाळा वाडकर, माजी नगरसेवक ज्योती पाटणकर, लारा, भिमगर्जना बौध्द मंडळ व समाज मंदिर मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम, उपाध्यक्षा सौ. वर्षा कदम, सचिव रुपेश जाधव आदी उपस्थितीत होते. दरम्यान, श्री. परब यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. परब पुढे म्हणाले, भारतातील १४० कोटी नागरिक हे संविधानाप्रमाणे वागतात. बाबासाहेबांनी समाजात समानता आणण्यासाठी प्रयत्न केले. आज बाबासाहेबांची १३४ वी जयंती आहे. त्याना मी विनम्र अभिवादन करतो असे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles