Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

३० वर्षांची सुंदरी अन् ६० कोटींचा सौदा ! ; ‘या’ मॉडेलने सौदीसोबत केला घोटाळा.

ढाका : ३० वर्षीय बांगलादेशी मॉडेल मेघना आलम ही एक मोठी फसवणूक करणारी निघाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मेघना आलमने प्रथम सौदी अरेबियाच्या राजदूताला तिच्या प्रेमात अडकवले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिने फार कमी पैसे मागितले होते त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु मेघनाची मागणी हळूहळू वाढत गेली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मेघनाने ६० कोटी टका (सुमारे ४५ कोटी रुपये) मागितले तेव्हा सौदी राजदूताने तक्रार दाखल केली. आता मेघनाला पोलिसांनी ३० दिवसांची कोठडी सुनावली आहे. मेघनावर हनीट्रॅपचा आरोप आहे.

मेघनाने सौदीच्या राजदूताला कसे अडकवले?

फेब्रुवारी २०२० मध्ये, इस्सा बिन युसूफ अल-दुहैलान यांची बांगलादेशचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. रिपोर्टनुसार, इस्सा आणि मेघना एका जवळच्या मैत्रिणीच्या माध्यमातून एकत्र आल्या. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलत गेले. मेघनाच्या म्हणण्यानुसार, या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंधही होते. २०२४ मध्ये जेव्हा इस्साची बदली झाली तेव्हा मेघनाने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सुरुवातीला इस्साकडून काही पैशांची मागणी करण्यात आली आणि नंतर मेघनाने ६० कोटी रुपयांची मागणी केली. पोलिसांचे म्हणणे आहे की मेघनाने इस्साचे काही वैयक्तिक व्हिडिओ देखील बनवले होते. इस्साला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. ती व्यक्ती सौदीमध्येच व्यवसाय करते.

पोलिसांनी हे हनीट्रॅप प्रकरण विशेष शाखेकडे सोपवले आहे. मेघनाने यापूर्वी कोणत्याही राजदूताला यात सामील केले आहे का, याचा तपास बांगलादेश पोलिस करत आहेत. पोलिस हनीट्रॅपच्या इतर दुव्यांचाही तपास करत आहेत. दुसरीकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियाशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर सौदी अरेबिया काही मोठी कारवाई करू शकते अशी भीती बांगलादेशला आहे. मेघना बांगलादेशात एक सुंदर मॉडेल म्हणून गणली जाते. मेघनाने मिस अर्थचा किताबही जिंकला आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles