वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी येथील नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या श्री गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ आज शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

यानिमित्त मंदिरात पहाटे ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.
ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


