Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सावधान ! – बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट ! ; केंद्र सरकारने दिला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला.

नवी दिल्ली : चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. दरम्यान, आता बाजारामध्ये खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. यासंदर्भात, केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त करत हाय अलर्ट दिला आहे. ५०० रुपयांच्या या नोटा अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसतात. खऱ्या नोटा आणि खोट्या नोटा यामधील फरक ओळखणे कठीण आहे. मात्र, काही गोष्टी बारकाईने पाहिल्यावर, परखल्यावर हा फरक ओळखणे शक्य होईल, असे सरकारने म्हटले आहे.

५०० रुपयांच्या बनावट नोटांबाबत बजावलेल्या अलर्टबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, बनावट नोटा ह्या गुणवत्ता आणि छपाईच्या बाबतीत खऱ्या नोटांशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण आहे. यांचा रंग आणि रूप हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणेच आहे.

गृहमंत्रालयाने सांगितले की, या नोटा ५०० रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे दिसत असल्या, तरी त्यांच्या स्पेलिंगमध्ये एक चूक झालेली आहे. त्यामुळे त्या सहजपणे ओळखता येतात. ५०० रुपयांच्या बनावट नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ओळीमध्ये ही चूक झालेली आहे. त्यात रिझर्व्ह या शब्दामध्ये एकेठिकाणी ईच्या ऐवजी एचा वापर करण्यात आला आहे. ही छोटीशी चूक सहजपणे नजरेत येत नाही. त्यामुळे या नोटा सहजपणे चलनात पसरू शकतात, अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, या नोटा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आल्या असल्याचा इशाराही तपास यंत्रणांनी दिला आहे. तसेच बँका आणि नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.
…………………………………….

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles