Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

साळगांव घाटकरवाडी येथे श्री भवानीमाता त्रैवार्षिक गोंधळ महोत्सव. ; १ ते ४ मे कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ : तालुक्यातील साळगांव घाटकरवाडी येथे आई भवानीमातेचा त्रैवार्षिक गोंधळ महोत्सव शुक्रवार दिनांक २ मे ते रविवार दि. ४ मे २०२५ या कालावधीत परंपरेनुसार श्री भवानी माता मंदिर, घाटकरनगर, साळगांव येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व भक्तांनी देवीचा आशीर्वाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक घाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ, साळगांव आणि घाटकरवाडी ऐक्यवर्धक मंडळ, मुंबई यांनी केलं आहे.

यावेळी आयोजित केलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

शुक्रवार, दि. २ मे २०२५ रोजी 

सायं. ५.०० वा. देवीचा मांड भरणे व पूजा.

सायं. ७.३० वा. भक्तगणांसाठी प्रसाद भोजन.

रात्रौ ९.०० वा. गोंधळ व दिवटी फेर नृत्य

रात्रौ १०.०० वा. नवस व संकल्प.

रात्रौ ११ ते पहाटेपर्यंत गोंधळी आख्यान.

पहाटे ५.०० वाजल्यापासून देवीच्या ओट्या भरणे प्रारंभ

शनिवार, दि. ०३ मे २०२५ रोजी

सकाळी ६ ते ११ पर्यंत देवीच्या ओट्या भरणे.

सकाळी ११ ते १ पर्यंत – श्री सत्यनारायण महापूजा.

दुपारी १ ते ३ पर्यंत –  महाप्रसाद (भंडारा).

सायं. ५ ते ८ – पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ.

सायं. ५.३० ते ८ पर्यंत –
महिलांसाठी खास कार्यक्रम – ‘खेळ पैठणीचा, जागर नारीशक्तीचा.! (मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्यक्रम)
सादरकर्ते – प्रा. रूपेश पाटील (सावंतवाडी)

रात्रौ ८ ते ९ पर्यंत सौ. चित्रा सर्वेकर-जोशी यांचे स्वरनिनाद, सुगम संगीत कार्यक्रम.

रात्रौ ९ ते ९.३० पर्यंत बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ.

रात्रौ ९.३० वा. श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार मंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग.

रविवार, दि. ०४ मे २०२५ रोजी.

सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत घाटकरवाडी प्रिमियर लिग. (अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा.)

तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन घाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ, साळगांव घाटकरवाडी ऐक्यवर्धक मंडळ, मुंबई यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles