सावंतवाडी : राज्य परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बसेस गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आगारास उपलब्ध झाल्या आहेत. सावंतवाडी बस स्थानक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, सावंतवाडी विभागात नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार सावंतवाडी विभागात 5 नवीन लाल परी उपलब्ध करून देण्यात आल्या. येत्या काळात अजून काही बसेस उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, श्रर्वानी पाटकर, संदेश सोनुरलेकर, सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित, स्थानक प्रमुख राजाराम राऊळ, वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रेशा सावंत, हेड मॅकेनिक आनंद पंडित आदी उपस्थित होते.
सावंतवाडी आगारास उपलब्ध ५ नवीन गाड्या या सावंतवाडी ते पुणे स्टेशन, सावंतवाडी – बांदा – बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. या नव्या गाड्यांमध्ये आरामदायक बैठक व्यवस्था, पुश बॅक सीट, चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


