बीड : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला 12 वी मध्ये 85. 33 टक्के मिळालेले आहेत. आज महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन देखील घेतलं होतं. यावेळी वैभवी भावुक झाली होती. तर 1 वाजता निकाल जाहीर झाल्यावर वैभवीला 85. 13 टक्के गुण मिळाले असल्याचं समोर आलं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर वैभवीला वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले. कौतुकाची थाप मारायला आज वडील नाही अशी भावना निकालाआधीच वैभवीने व्यक्त देखील केली होती. आजच नाही तर यापुढे कधीच त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही. आज माझं कुटुंब उघड्यावर पडलं आहे, हे बोलताना वैभवी वडिलांच्या आठवणीने गहिवरून गेली.
बारावीच्या परीक्षांच्या काळातच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. त्यामुळे देशमुख कुटुंब त्या दु:खात असतानाच वैभवीने ही परीक्षा दिली होती. त्यामुळे तिच्या या यशाचं आज सगळ्यांनाच कौतुक वाटत आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


