सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मळगाव रस्तावाडी येथे संध्याकाळी चालण्यासाठी गेलेले मुरलीधर विठ्ठल गवंडे (वy – 59, राहणार मळगाव रस्तावाडी) यांचे गळ्यातील दहा ग्रॅम चे सोन्याची चैन अज्ञात इसमाने २७/४/२०२५ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता चे सुमारास एका स्कूटरवरून येऊन चैन खेचून पळून गेला होता. त्याबाबत चेन स्नेचिंगचा गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता.
आजूबाजूचे सीसीटीव्ही व गोपनिय माहितीच्या आधारे महिला पोलीस उपनिरिक्षक श्रीमती मुळीक यांनी काढलेल्या माहितीच्या आधारे व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथकाने आरोपी वासुदेव उर्फ दीपराज दामोदर मुळवी (वय 38 वर्ष, रा. घर नंबर 49 गावणे. बांदोडा फोंडा गोवा) याला दिनांक ३/५/२०२५ रोजी दीपराज यास ताब्यात घेतले होते.
आरोपी वासुदेव उर्फ याचेकडे सखोल तपास करून तपासी अंमलदार हेड कॉन्स्टेबल धोत्रे वालावलकर यांनी व रामदास जाधव यांचे मदतीने आरोपीने गुन्हा करताना वापरलेले वाहन व चोरलेले सोने फोंडा, गोवा येथून हस्तगत केले असून गुन्ह्याची पूर्णता उकल केलेली व पूर्ण माल जप्त केलेला आहे. आरोपीला सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी प्राप्त झालेली आहे.
सदरची कामगिरी प्रभारी पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकश्रीमती मुळीक, हवालदार धोत्रे, वालावलकर व रामदास जाधव यांनी केले आहे.