सावंतवाडी : माहीमचे आ. महेश सावंतांच्या नेतृत्वात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथे उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांना दिनांक 15/03/2024 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले.
आपल्या निवेदनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी म्हणतात, दि. 15/03/2024 रोजीचा शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या भागातील शाळेचा समावेश आहे. तीन ही तालुक्यातील भौगोलिक परिस्थितिचा विचार करता सदर शाळा अती दुर्गम भागात आहेत. पावसाळी हंगामात सदर ठिकाण पूर परिस्थिति निर्माण होते. शासनाने काढलेला शासना निर्णय पूर्णपणे चुकीचा असून विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणान आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्हया शिक्षण समन्वय समितिने अभ्यासपूर्वक शासन निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे. सादर मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पू पाठिंबा आहे. तरी आमच्या निवेदनाचा सहानुभूति पूर्वक विचार करून दि. 15/03/2024 रोजीचा शासन निर्ण रद्द करावा.
यात त्यांच्या प्रमुख मागण्या –
1. दि. 15/03/2024 रोजीचा शासन निर्णय रद्द करणे.
2. R.T.E. Act. च्या शेड्युल मध्ये नमूद केल्या प्रमाणे सर्व संच मान्यता करणे.
3. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने सुचविलेली R.T.E. Act. च्या शेड्युल प्रमाणे योजना शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताच्या असल्यामुळे त्वरित अमलात आणणे.
यावेळी माहीमचे आ. महेश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, चंद्रकांत कासार, अशोक परब, सौ. श्रुतिका दळवी, समिरा खलील, शब्बीर मणियार, शिवदत्त घोगळे यांसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.