Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबाली येथे उन्हाळी सुट्‌टीतील साहसी व नेतृत्व विकास शिबिरात मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग !

आंबोली : दी कर्नल्स अॅकॅडमी फॉर अॅडव्हेंचर अॅण्ड अॅरो स्पोर्टस् व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल श्रेण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोली आयोजित शनिवार दिनांक २६ ष्टप्रिल २०२५ते शुकवार दि.०२ को २०२५ या कालावधीमध्ये साहसी खेळांचे शिबीर घेण्यात आले.

या शिविरीमध्ये १० वर्षावरील मुला मुलींना प्रवेश देण्यात आलेला होता. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या विविध भागातून आंबोली या पर्यटन स्थळी या साहसी शिबिराकरीता ५० मुले-मुली सहभागी झाले होते सहयाद्रीच्या डोंगर माध्यावर वसलेल्या, निसर्गाने मंत्रमुग्ध केलेल्या या हिल स्टेशनवरती सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स् सविर्हसमेन असोशिएशन, सिंधुदुर्ग संचलित दि कर्नल्स अॅकॅडमी फॉर अॅडव्हेंचर अॅण्ड अॅरो स्पोर्टस् व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने हि शिबिरे आयोजीत केली जातात.

हे शिबीर शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५वे शुकवार दि.०२ मे २०२५ या कालावधीत संपन्न झाले. शिबिरामध्ये सहभागी मुला-मुलींना पी.टी. योगासने, जीम, मार्शल आर्ट, नेमबाजी, रॅपलिंग, रॉक क्लायबिग, बर्ड अॅण्ड प्लान्ट ऑब्झर्वेशन, व्हॅलीली क्रॉसिंग ट्रेकिंग व लीडरशिप डेव्हलपमेंट इ. प्रकारचे प्रशिक्षण अनुभवी व प्रशिक्षित महिला व पुरूष प्रशिक्षकांकडून दिले. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सर्व प्रकारामध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. महादेव गड हिरण्यकेशी राघवेश्वर इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांना ट्रेकिंगसाठी नेण्यात आले. मुलांनी आंबोली वन उद्यान येथे आंबोली मधील विविध वन्य प्रणाची माहीती वन्य अभ्यासक श्री हेमत ओगले यांचेकडून घेतली. तसेच वन भोजनाचा आनंद घेतला. सर्प मित्र श्री आनंद चि‌ली यांनी विविध सापांविषयी सविस्तर माहिती दिली. ‘चला विज्ञानाकडे विज्ञानाचे चमत्कार’ व्याख्यानामध्ये पंडित वंजारी उत्तूर यांनी विविध प्रात्यक्षिकासह वैज्ञानिक माहिती दिली. आहार व आरोग्य या विषयात सुनील सोनसुरकर यांनी माहिती दिली. श्रीम. त्रिवेनी शिंगाडे यांनी लोकमाता अहील्याबाई होळकर या विषयावर व्याख्यान दिले.

नियमित अभ्यास आणि पुस्तकांच्या ओझ्याखालून बाहेर काढून मुलांना निसर्गाच्या सांनिध्यात साहसी खेळा बरोबर मुलांमधील नेतृत्व गुणांचा विकास करणे व सुप्तगुनांना वाव देणे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे या शिबिराचे उदिष्ट आहे.

शिबिराची सांगता विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक गुण दर्शन कॅमफायरने करण्यात आली. सर्व विद्याथ्यार्ना उपस्थित पालक व प्रशिक्षक प्राचार्य यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. शाळेचे प्राचार्य श्री नितीन गावडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कॅम कमांडर श्री मायाप्पा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानून शिबिराची सांगता केली. सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग सैनिक स्कूल चे शिक्षक, प्रशिक्षक, इतर कर्म चारीवर्ग, प्रशिक्षणार्थी व पालक उपस्थित होते.

सैनिक स्कूलची २०२५ २६ करीता इ. ६ वीसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू असून शनिवार दिनांक 01 मे २०२५ वे शुकवार दि.०९ मे २०२५ या कालावधीत दुस-या निवड चाचणी शिबिराचे व साहसी खेळांच्या शिविराचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरी इच्छुक पालकांनी सैनिक शाळेशी संपर्क साधावा आणि आपल्या पाल्यास या साहसी शिबिरात सहभागी होण्याची सुवर्ण संधी दयावी, असे आवाहन शाळेचे प्राचार्य नितीन गावडे यांनी केले आहे.

संपर्क कमांक – ९४२०१९५५१८.९४२२९४६४७४

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles