सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीतील साहसी व नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन !

आंबोली : दी कर्नल्स अकॅडमी फाॅर अडवेंचर अँड अ‍ॅरो स्पोर्ट्स व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली आयोजित शनिवार दि. 26 एप्रिल 2025 ते शुक्रवार दि. 2 मे 2025 या कालावधीमध्ये साहसी खेळांचे शिबिर घेण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये 10 वर्षांवरील मुला-मुलींना प्रवेश देण्यात आलेला असून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या विविध भागातून आंबोली या पर्यटन स्थळी या साहसी शिबिरा करिता 50 मुले-मुली सहभागी झालेले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या, निसर्गाने मंत्रमुग्ध केलेल्या, या हिल-स्टेशनवरती सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन सिंधुदुर्ग संचलित दि कर्नल्स अकॅडमी फाॅर अडवेंचर अँड अँरो स्पोर्ट्स व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे आयोजित केली जातात.
हे शिबिर शनिवारी दि. 26 एप्रिल 2025 ते शुक्रवार दि. 2 मे 2025 या कालावधीत संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये सहभागी मुला-मुलींना पी.टी, योगासने, मार्शल आर्ट, नेमबाजी, रॅपलिंग,राॅक क्लायबिंग, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन,व्हॅलीक्रॉसिंग, ट्रॅकिंग व लीडरशिप डेव्हलपमेंट इ. प्रकारचे प्रशिक्षण अनुभवी व प्रशिक्षित महिला व पुरुष प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे.


नियमित अभ्यास आणि पुस्तकांच्या ओझ्याखालून बाहेर काढून मुलांना निसर्गाच्या सानिध्यात साहसी खेळाबरोबर मुलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे व सुक्त गुणांना वाव देणे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.
प्रारंभी सैनिक स्कूलचे सहा. शिक्षक श्री. नागेश पांढरे व श्री. मायाप्पा शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी व पालकांचे स्वागत करून शिबिराचे महत्व विशद केले.

मुलामुलींसाठी पूर्णतः निवासी असलेल्या या शिबिराचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्री. नितीन गावडे व उपस्थित प्रशिक्षणार्थी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्राचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनात सैन्य दलातील विविध संधी व व्यक्तिमत्व विकासासाठी निवासी शिबिरांची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे संचालक, शिक्षक, प्रशिक्षक, इतर कर्मचारी वर्ग, प्रशिक्षणार्थी व पालक उपस्थित होते.
सैनिक स्कूलची 2025-26 करिता सहावी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून शनिवार दि. 26 एप्रिल 2025 ते शुक्रवार दिनांक 02 मे 2025 या कालावधीत निवड चाचणी शिबिराचे व साहसी खेळांच्या शिबिरांचे आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच शनिवार दिनांक 03 मे 2025 ते शुक्रवार दिनांक 09 मे 2025 या काळातील दुसऱ्या साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक पालकांनी सैनिक शाळेशी संपर्क साधावा आणि आपल्या पाल्यास या साहसी शिबिरात सहभागी होण्याची सुवर्ण संधी द्यावी, असे आवाहन शाळेचे प्राचार्य सैनिक श्री. नितीन गावडे यांनी केले आहे.

संपर्क – 9420195518
9422946474

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles