सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलदगतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी 7823871798 हा विशेष संपर्क क्रमांक सुरू केलेला आहे.
जनतेची सेवा हीच माझी जबाबदारी समजून, मी आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.