Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

निसर्गरम्य आंबोली येथे होणार कोमसापचे यंदाचे ‘मिरगवणी संमेलन’.

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यंदाही मिरगवणी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यंदा हे संमेलन निसर्गरम्य, पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या आंबोली येथे संपन्न होणार आहे अशी माहिती शाखेचे तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी दिली. आज कोमसापच्या मासिक सभेत याबाबतची निश्चिती करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीची मासिक सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य अशा आंबोली येथे यंदाच मिरगवणी संमेलन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. लवकरच याची तारीख व कार्यक्रम स्थळ जाहीर करण्यात येईल असं अध्यक्ष श्री.सावंत यांनी सांगितले. जिल्हा साहित्य संमेलनात सहकार्य करणाऱ्यांचे ऋण यावेळी व्यक्त केले. तसेच सभेच्या प्रारंभी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील व ऑपरेशन सिंदूर दरम्यान विरमरण पत्करलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कै. डॉक्टर श्रीपाद कशाळीकर हे कोमसापचे ज्येष्ठ सदस्य यांच नुकतच निधन झाल. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्र.सचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, अँड. नकुल पार्सेकर, दिपक पटेकर, मंगल नाईक-जोशी, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles