सावंतवाडी : तालुक्यातील विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगावचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयातून 21 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक अविष्कार अनंत पांढरे ९२%,
द्वितीय क्रमांक कुमारी समृद्धी रामचंद्र मुळीक ९१.२०%,
तृतीय क्रमांक कुमार अथर्व प्रदीप काकतकर ८७% यांनी पटकावले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोक कल्याण शिक्षण संस्था मुंबईचे विश्वस्त श्री गुरुप्रसाद रेगे शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, सदस्य दत्तप्रसाद प्रभू मुख्याध्यापक उत्तम भागीत, सहाय्यक शिक्षिका सौ. काव्या साळवी, सौ. मानसी परुळेकर, एन. ए. वराडकर सर्व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.