सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम विलास रावजी सावंत ९८.६०%, द्वितीय आर्या रावजी राणे ९८.४०%, तृतीय जान्हवी ऋषिकेश गावडे ९८.२०% यांनी प्राप्त केले. एकूण प्रविष्ट विद्यार्थी 231 पैकी उत्तीर्ण 231 उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून तसेच मुख्याध्यापक रिचर्ड सालदान्हा, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शालेय व्यवस्थापन समिती व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.
मिलाग्रीस हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के !
0
115