Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक !

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवार, २४ मे रोजी सकाळी ९ वाजता उपरलकर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंगेश टेंबकर यांच्या पश्चात तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्रकार अमोल टेंबकर, प्रसाद टेंबकर आणि गॅरेज व्यावसायिक सुरज टेंबकर यांचे ते वडील होत.
सालईवाडा आयटीआय परिसरात त्यांचे ‘श्री समर्थ सायकल स्टोअर्स’ नावाचे गॅरेज होते, जिथे ते सायकल दुरुस्ती आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने टेंबकर कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles