Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कांद्याचे भाव गगनाला भिडणार?

पुणे : मे महिन्यात दक्षिण तसेच मध्य भारतात जोरदार पाऊस झाला. मे महिन्यात पाऊस आल्याने अनेक पिके खराब झाली. देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे देखील पावसामुळे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांद्याचे पिक खराब झाले. गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले पीक गमावले. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक संघटनेने असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाल्याने येत्या काही दिवसात राज्यातील कांद्याच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मे महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. या पत्रात म्हटले आहे की, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, सांगली, बुलढाणा, अकोला, परभणी आणि जालना अशा कांदा उत्पादक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला.
ज्या शेतकऱ्यांचे संपूर्ण रब्बी हंगामातील पिकांचे कापणीपूर्वीच नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांनी यांनी केली आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles