सावंतवाडी : आमचे मार्गदर्शक आणि सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणजे आमच्यासाठी एक ऊर्जा स्त्रोत आहेत. त्यांचे आज वय 50 असले तरी त्यांची ऊर्जा ही आमच्यासारख्या युवकांनाही कार्य करण्याला प्रवृत्त करणारी आहे. त्यांचा जिंदादिल, मितभाषी स्वभाव मला विशेष आवडतो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य आम्हाला प्रेरणादायी असून त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष व यशस्वी उद्योजक विशाल परब यांनी येथे व्यक्त केले.

आज भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा वाढदिवस भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप भालेकर यांच्यासोबत भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालजी परब, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक राजूबेग, सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, भाजपा सावंतवाडी मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर, महिला सरचिटणीस मेघना साळगावकर, केतन आजगांवकर, परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद भागवत, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, धीरेंद्र म्हापसेकर, कुणाल सावंत, बुथ अध्यक्ष रवी नाईक, विराग मडकईकर, ज्ञानेश पाटकर, अमित गवंडळकर, सॕबेस्तीन फर्नांडीस, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांवस, जहूर शेख, जेष्ठ भाजपा कार्यकर्ते पुरूषोत्तम केनवडेकर, बंड्या केरकर, प्रसाद कशाळीकर, बापू सुभेदार, भार्गव धारणकर, विजय सावंत, ललित नाईक, योगेश आरोलकर, दयानंद रेडकर, संतोष खंदारे, भगवान वाडकर, स्वप्नील कदम, सुरेंद्र कासकर, लक्ष्मण बांदेकर, सुकन्या टोपले ,जोती मुद्राळे , समीक्षा खोचरे, पूजा कशाळीकर, रेखा लाखे, नेहा लाखे, प्रांजल जाधव, गीता नेगर, गणेश पडते, विपुल व्हाराडकर, प्रसाद राणे, एकनाथ पेडणेकर, प्रथमेश पेडणेकर, दीपक सावंत, योगेश दळवी, अनुष्का केरकर, गौरवी साटेलकर, मेधा कशाळीकर, पूर्वा गवस, अनिशा राणे, प्राप्ती राणे, योगेश दळवी, रशमी केरकर, स्नेहल जाधव, पूजा केरकर, गीता रेगर, राजे प्रतिष्टान अध्यक्ष संतोष तळवणेकर, नागेश गावडे आदी उपस्थित होते.
दिलीप भालेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा –
दरम्यान साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संचालित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी मुलांना भेट वस्तू, खाऊ वाटप करून व केक कापून दिलीप भालेकर भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सावंतवाडी कुटीर रुग्णालयामध्ये रुग्यांना भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आले.


