कुडाळ : कुडाळ औद्योगिक वसाहतीत गेल्या दोन वर्षापासून कामगारासाठी ‘ईसआय’चे कार्यालय सुरू असून याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, म्हणून कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशन व ‘ESI’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी कामगारांसाठी असलेल्या या लाभदायी योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपण प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे असे सांगितले.
सामाजिक सुरक्षा आरोग्य योजनेची माहिती देताना व्यवस्थापक श्री सुरेंद्र नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. ही योजना खाजगी व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सेवा, आजारपणातील रोख मदत, प्रसुती लाभ आणि अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळू शकते.
ज्या कंपन्यामध्ये दहापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात अशा कंपन्यांमधील ठराविक पगाराच्या मर्यादेपर्यंत कर्मचाऱ्यांना ही योजना लागू असते. इस आय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. माञ गंभीर आजारासाठी खाजगी रुग्णालयात जर उपचार घेतले तर त्याचाही खर्च दिला जातो.
कामावर असताना अपंगत्व आल्यास नव्वद टक्के पर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच कामावर असताना मृत्यू आल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबाला पेन्शन मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी असोसिएशनने सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापक श्री नाईक यांनी केले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. श्री नितीन पावसकर ही योजना फक्त कागदावर न रहाता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत इस आयचे सहाय्यक व्यवस्थापक श्री राहुल मांडवकर,असोसिएशनचे श्री आनंद बांदिवडेकर, श्री संजीव प्रभू, श्री कुणाल ओरसकर यांनी सहभाग घेतला.
आपल्या समारोपाच्या संबोधनात असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी कामगारांच्या कल्याणासाठी असलेली ही शासकीय योजना कामगारां पर्यंत व उद्योजकां पर्यंत पोहचवण्यासाठी आपण सगळ्यानीच सामुदायिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी श्री बिश्नोई,प्रमोद भोगटे,शशिकांत चव्हाण, श्री उदय शिरोडकर, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, विष्णूमुर्ती राणे, मयुरेश पुरोहित, मंगेश तेरसे श्री हर्षवर्धन बोरवडेकर,जयिनंद वरगावकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ही बातमी घ्या
आरोग्य सुरक्षा योजनेचा कामगारांनी लाभ घ्यावा ! ; ‘ESI’ चे व्यवस्थापक सुरेंद्र नाईक यांचे आवाहन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


