सावंतवाडी : कुडाळ – मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या मडूरा येथील निवासस्थानी विराजमान असलेल्या ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यावेळी परब कुटुंबीयांकडून आमदार निलेश राणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी आमदार निलेश राणे यांनी संजू परब आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि पदाधिकारींशी आपुलकीयुक्त संवाद साधत सुख-दुःखाची विचारपूस केली. यानंतर ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि संपूर्ण परब परिवार, झेवीयर फर्नांडिस, बंटी पुरोहीत, सत्यवान बांदेकर, क्लॅटस फर्नांडिस, दत्ताराम परब आणि बाळू गावडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


