वेंगुर्ला : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय!’ या ब्रीद नुसार जनतेचे रक्षण करणाऱ्या माझ्या तमाम पोलीस बांधवांना उदंड आणि निरामय आयुष्य द्या! त्यांच्या मार्गातील सगळे विघ्न दूर करा, अशी मनोभावे प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे केली. वेंगुर्ला येथील पोलीस स्टेशनमध्ये विराजमान असलेल्या गणरायाचे युवा नेते विशाल व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले यावेळी श्री. परब बोलत होते.
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी घेतले वेंगुर्ला पोलीस ठाण्यात 17 दिवसांसाठी विराजमान असलेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, पांडुरंग खडपकर, जयेश सरमळकर, सचिन शेटये आदी होते.


