वेंगुर्ला : म्हापण येथील उत्साही मित्र मंडळ आयोजित ‘सुतार बंधू प्रेझेंटस झंकार सांस्कृतिक कार्यक्रम’ ला भेट देण्याची संधी मिळाली. या निमित्ताने झालेल्या माझ्या सत्कार सोहळ्याबद्दल तमाम युवा कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभारी आहे. आगामी काळात मंडळासाठी जे जे सहकार्य लागेल ते नक्की करू, असे प्रतिपादन सत्कार सोहळ्याप्रसंगी युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त.
उत्साही मित्र मंडळ, नवरात्र, म्हापण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुतार बंधू प्रेझेंटस झंकार सांस्कृतिक कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली.
यावेळी म्हापण येथे धरी. परब यांचा स्नेहसत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष नाथा मडवळ यांच्या हस्ते विशाल परब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परब यांनी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल मंडळाचे कौतुक केले आणि उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नाथा मडवळ यांच्यासह निकेत राऊळ, देवराज गवडे, विकास गवडे, आणि अजय नार्वेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आयोजित या ‘झंकार सांस्कृतिक कार्यक्रमा’मुळे स्थानिकांना एक चांगला मंच उपलब्ध झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


