नागपूर : महसूल सेवक संघटना महाराष्ट्र राज्य व विदर्भ महसूल सेवक संघटनाच्या वतीने दिनांक 12/09/2025 पासून नागपूर संविधान चौक येथे कामबंद आंदोलन चालू आहे. शासन दखल घेत नसल्याने आता संघटनेने अन्नत्याग उपोषणाचा गेले 4 दिवसांपासून चालू आहे. महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणी मिळावी ही प्रमुख मागणी घेऊन राज्यातील सर्व महसूल सेवक आंदोलनात उतरले आहे.राज्य तलाठी संघटनेनेही महसूल सेवक यांना पाठिंबा दिलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तलाठी संघटनेनेही सदर आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख महसूल सेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यातील 12000 पेक्षा जास्त महसूल सेवक या आंदोलनात आहे. संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष या आंदोलकांवर आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या जिल्ह्यात हे आंदोलन चालू आहे तरी मंत्री महोदय का दुर्लक्ष करीत आहेत? असा सर्वसामान्य महसूल सेवक यांना पडला आहे . अन्नत्याग उपोषणाचा आजचा 5 वा दिवस असून ही सरकार का गप्प आहे?, उपोषण करता यांच्या प्रकृती नाजूक स्थितीत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे सर्वसामान्य महसूलसेवक यांची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल सेवक सुद्धा याकडे लक्ष देऊन आपणास न्याय मिळावा?, अशी अपेक्षा करून आहेत.


