सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचा मोठा करिष्मा झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कलंबिस्त सरपंच स्वप्ना सावंत यांनी आपल्या उपसरपंच व इतर दोन सदस्यांसह भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीचा दबदबा देशविदेशात वाढत असताना राजकिय क्षेत्रात आपले भवितव्य घडवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना हजारो नवयुवकांना भाजपाचे आकर्षण प्रचंड वाढू लागले आहे.
केवळ त्या सर्वांशी नेमक्या वेळी संवाद साधला तर कोकणातही भाजपात प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागेल हा विश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बिंबवणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार नारायण राणे साहेबांच्या मार्गदर्शना खाली तसेच युवा नेते विशाल परब यांच्या अथक प्रयत्नानी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावच्या माजी सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्यासंखेने भारतीय जनता पार्टी त प्रवेश केला.
भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या कलंबिस्तच्या सरपंच सौ. सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रा.पं. सदस्य. सौ. रिया राजेश सावंत, सौ. मेघा तावडे, आणि शिवसेना (उ.बा.ठा.) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर, माजी जिल्हा सदस्य पंढरी राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, संतोष पालेकर, युवा मोर्चा आंबोली निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ, पुंडलिक कदम, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मडगावकर यांनी तर सूत्रसंचालन प्रल्हाद तावडे यांनी केले.केले


