वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी – कनयाळ येथील श्री नवदुर्गा मातेची पूजा करीत मनोभावे दर्शन घेत भारताचे महान क्रिकेटर सुनील गावस्कर व गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबीयांसह आपली भक्ती प्रकट केली. तसेच त्यांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वादही घेतला.

जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होत असल्याचे यावेळी सुनील गावस्कर यांनी सांगितले.


