सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे वार्षिक जत्रा येत्या 6 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने देवस्थान कमिटी कडून ग्रामस्थांच्या मदतीने जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुर्तावरील झाडी तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे. एकूणच या जत्रोत्सवाची ओढ सर्वांना लागून राहिली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाकडे पाहिले जाते आगळीवेगळी लोंटांगणाची जत्रा म्हणूनही ही जत्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ही जत्रा पार पडणार आहे या निमित्ताने देवस्थान कमिटी कडून जत्रोत्सवाची तयारी युद्धपातळीवर हाती घेतली आहे. सद्यस्थितीत मंदिर परिसराची साफसफाई विद्युत रोषणाई मंडप व्यवस्था आधी काम हाती घेण्यात आले आहे तसेच मंदिराकडे जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फावरील झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून हे काम सुरु असून खुद्द ग्रामस्थांनी यात सहभाग दर्शविला आहे.
यावर्षी जत्रोत्सवावर काहीसे पावसाचे सावट असल्याने तशा प्रकारची उपायोजना ही करण्याचे नियोजन देवस्थान कमिटी कडून आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात येणारे भाविक भक्त आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग व्यवस्थेवरही यावर्षी भर देण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारे जत्रोत्सवाला येताना वाहतूक कोंडी तसेच अडचण होऊ नये यासाठी देवस्थान कमिटी कडून काळजी घेण्यात येत आहे सावंतवाडी पोलीस प्रशासनालाही याबाबत कळवण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चोख नियोजन करत जत्रोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटीने कंबर कसली आहे.
सोनुर्ली जत्रोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू! ; ६ नोव्हेंबरला जत्रोत्सव, वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


