वेंगुर्ला : “एक भारत, अखंड भारताचे” शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक वसंत तांडेल व जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्य आंदोलन काळात बारडोली सत्याग्रहातील त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्यामुळे भारतीय महिलांनी त्यांना सरदार ही उपाधी दिली.
सरदार पटेल हे सन 1947 ते 1950 या काळात भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. देश एकसंध ठेवण्यासाठी हैदराबादच्या निजाम संस्थानासह देशातील एकूण 565 संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ज्यामुळे त्यांना “भारताचे लोहपुरुष” हे विशेषण मिळाले. सन 1947 च्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान भारताला एकात्मतेचे मार्गदर्शन त्यांनी केले.
जगातील सर्वात उंच पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) – गुजरात मधील नर्मदा नदीवरील साधू बेटावर त्यांचा 182 मिटर (597 फूट) ईतका जगातील सर्वात ऊंच पुतळा उभारल्या गेला ज्याचे लोकार्पण दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून घोषित केला.
राष्ट्र उभारणीत त्यांच्या या अतुलनीय, मौल्यवान आणि ऐतिहासिक योगदानाबद्दल आपण सारे नतमस्तक होऊ या असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .
यावेळी अभियान जिल्हा सहसंयोजक हेमंत गावडे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, मच्छिमार नेते अनंत केळुस्कर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, वृंदा मोर्डेकर, कार्तिकी पवार, बूथ अध्यक्ष नामदेव सरमळकर, शेखर काणेकर, दिपक माडकर, अजिंक्य खोत, जयदेव अणसुरकर, शैलेश मयेकर, अजित कनयाळकर, वासुदेव मालवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


