सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथील रहिवासी ललित परब (वय 30) या युवकाचे आज सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये रवी जाधव व निखिल जाधव यांच्या सहकार्याने दाखल केले होते. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
उद्या त्यांना सकाळी दहा वाजता सावंतवाडी स्मशानभूमीमध्ये आणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. तरी त्यांचे कोणी नातेवाईक किंवा मित्र मंडळी असतील तर त्यांनी रवी जाधव (मोबाईल क्रमांक 9405264027) यांच्याशी संपर्क साधून या साठी सहकार्य करावे अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.



