Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपचाचं झेंडा फडकणार! : मनीष दळवी. ; भाजपचा दमदार शक्तीप्रदर्शनासह प्रचाराचा शुभारंभ!

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आज मोठ्या ताकदीची प्रदर्शन करत भव्य प्रचाराची सुरुवात केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप आणि २० नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्ल्याच्या ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी व श्री देव रामेश्वर यांच्या चरणी श्रीफळ ठेवून मंगलमय वातावरणात करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा का. सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले “खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने भाजपाचा झेंडा वेंगुर्ला नगरपरिषदेवर निश्चित फडकेल,” असा दमदार विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे नगरसेवकपदाचे उमेदवार उत्साहात मैदानात उतरल्यानंतर वेंगुर्ला राजकीयदृष्ट्या रंगात आली आहे. उमेदवारांमध्ये मंजुषा महेंद्र आरोलकर, रवी रमाकांत शिरसाठ, गौरी गणेश माईणकर, प्रीतम रमाकांत सावंत, विनायक सदानंद गवंडळकर, गौरी सुदेश मराठे, आकांक्षा आनंद परब, तातोबा उर्फ सुधीर महादेव पालयेकर, सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, विनय अशोक नेरूरकर, रिया वासुदेव केरकर, सदानंद तुळशीदास गिरप, काजल किरण गिरप, सचिन भगवान शेट्ये, श्रेया शैलेश मयेकर, प्रसाद विनायक गुरव, युवराज लक्ष्मण जाधव, यशस्वी योगेश नाईक, प्रणव बाबली वायंगणकर, शीतल द्यानेश्वर आंगचेकर यांचा समावेश आहे. भाजपच्या या शक्तीप्रदर्शनातून पक्ष वेंगुर्ला नगरपरिषदेवर झेंडा रोवण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील दिवसांत प्रचाराला आणखी वेग येणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles