Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

एकदा रणांगणात उतरलं की फक्त लढायचं असतं!, संघर्षात कोणीच कोणाचं नसतं! ; कार्यसम्राट आ. निलेश राणे यांनी फुंकलं रणशिंग. कणकवलीत शहर विकास आघाडीचे दमदार शक्तिप्रदर्शन!

कणकवली : आता ही लढाई आहे आर या पारची त्यासाठी आपण आपलं जीवाचं करु रान, रक्ताचं पाणी करु आणि नगराध्यक्षपदी संदेश पारकरांना निवडून आणू तरच आता गप्प बसू, असं प्रतिपादन कुडाळ – मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं. कणकवली येथे आ. निलेश राणे बोलत होते. यावेळी आ. राणे पुढे म्हणाले, शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण जिंकवू त्यासाठी हवं तर रथी- महारथी कणकवलीत उतरवू. आता कोणतीही तडजोड नाही. दगा देणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करा. जेव्ह गरज पडली तेव्हा मला नक्की बोलवा. असा दिवस उजाडेल असं कधीच वाटलं नव्हतं. आपल्या पक्ष तत्वांशी आपण तडजोड केली नाही. आता विजयासाठी कामाला लागा. आपल्या समोर कोण आहे? याची अजिबात चिंता करू नका. आता श्रीकृष्णांचा आदर्श सर्वांनी नजरेसमोर असू द्या. लढाईत कोण नसतं. ह्या निवडणुकीत आपला सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे तो फक्त विकासाचा!, असे प्रतिपादन शिवसेनेचे दमदार आ. निलेश राणे यांनी कणकवलीत केले. शहर विकास आघाडीची राजन तेलींच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला ठाकरे आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. निलेश राणेंच्या उपस्थिती शहर विकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles