सावंतवाडी : येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा जोरदार प्रचार सुरू असून प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार गोविंद वाडकर व वेदिका सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला.
दरम्यान यावेळी “कोणी कितीही गाजावाजा केला तरी या प्रभागातील आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील”, असा ठाम विश्वास संजू परब यांनी ‘सत्यार्थ’ जवळ व्यक्त केला.



