वेंगुर्ला : तालुक्यातील आरवलीच्या ऐतिहासिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांचे वेतोबा मंदिरात दर्शन; ग्रामस्थांशी साधला संवाद
कोकणचा जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक उत्सवानिमित्त भाजप युवा नेते श्री. विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
श्री. विशालजी परब यांनी वेतोबा चरणी नतमस्तक होऊन कोकणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रार्थना केली. वेतोबा देवाच्या आशीर्वादाने आपण जनतेची सेवा करण्यासाठी अधिक सक्षम होऊ, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
युवा नेते श्री. विशाल परब यांनी जत्रेसारख्या मोठ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकांमध्ये मिसळण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारला असून, भाजपच्या माध्यमातून विकासकामे अधिक गती घेतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.त्यावेळेस उपस्थित मान्यवर होते आरवली सरपंच श्री समीर कांबळी,आरवली माजी सरपंच श्री तातोबा कुडव,आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर,
सागर तीर्थ सरपंच श्री एकनाथ उर्फ शेखर कुडव,वेतोबा देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री जयवंत राय,
देवस्थान कमिटी सदस्य प्रसाद साळगावकर,आरवली शक्ति केंद्रप्रमुख नाईकभाजपा ज्येष्ठ नेते शेखर गोडकर.
सर्वे भवंतु सुखिन:! – श्री देव वेतोबाच्या चरणी युवा नेते विशाल परब नतमस्तक!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


