सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पार्टीच्या वतीने स्थानिक देवतांचे आशीर्वाद घेवून प्रचाराला शुभारंभ केला. श्री देव पाटेकर, श्री देवी सातेरी, श्री देव उपरलकर यांचे दर्शन व आशीर्वादाने प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ ठेवून करण्यात आला.


प्रभाग क्रमांक ६ उमेदवार श्री रवळोजीराव उर्फ उदय कृष्णराव भोसले व दिशा गुरुदत्त कामत या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.



या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी श्री सुरेश गवस, श्री सत्यजित धारणकर, श्री विजय कदम, श्री गुरुदत्त कामत, श्रीमती मानसी देसाई, श्रीमती रिद्धी परब, श्री समीर शेख, श्री दीपक देसाई, श्री रोहन परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


