वेंगुर्ला येथे झाला विजयाचा शंखनाद! ; जनतेच्या दारात ‘विशाल’ संवाद!

वेंगुर्ला : आज भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी व उमेदवार त्यांच्यासोबत होते.
भाजप युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराचा ‘झंझावाती’ दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


हा दौरा सुरू असताना भाजपचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उमेदवार त्यांच्यासोबत उपस्थित होते. विशालजी परब यांच्या नेतृत्वाखालील या एकजुटीच्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
हा झंझावती दौरा मतदारांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनसंपर्क वाढवण्याकरिता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री. परब यांनी विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि भाजपच्या धोरणांची व विकासकामांची माहिती दिली.
विशाल परब यांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक वॉर्डात नागरिकांच्या भेटी घेतल्या. स्थानिक रहिवाशांच्या मूलभूत सुविधा, विकासकामे आणि इतर समस्यांची त्यांनी नोंद घेतली.
आगामी निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भाजपच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles