सावंतवाडी : श्री देवी पावणाई रवळनाथ हरिनाम सप्ताहानिमित्त श्री हेळेकर उत्सव मंडळ, वेर्ले – पैलाडवाडी यांच्या वतीने ‘भव्य वारकरी दिंडी सोहळा’ सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या दिंडी सोहळ्याची सुरुवात पारंपरिक विठ्ठल–रखुमाई दर्शनाने होणार असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, साईबाबा आदींच्या पालख्या, आकर्षक वेषभूषा आणि टाळ–मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांची फेरी निघणार आहे.
यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून ‘पारंपरिक बैलगाडी सजावट’ ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तरी सर्व भाविक, वारकरी बांधव व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.


