सावंतवाडी : लोकशाहीचे कैवारी, अशक्य वाटणाऱ्या कोकण रेल्वेची प्रथम कल्पना मांडणारे, अनाथांचे नाथ, प्रकाश पुत्र बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र आदर्शवावी असून तरुणपिढीने त्यांचे जीवनचरित्र समजावून घेणे आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भरत गावडे यांनी केले.
समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली या ग्रंथालयाच्या वतीने बॅ. नाथ पै जंयतीनिमित्त माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम आयोजित संपन्न झाला.

यावेळी कोकणरत्न बॅ. नाथ पै यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहसचिव गजानन गावडे, वाचक श्री. परब, कमलाकर लातये, भारकर परब आदी उपस्थित होते.
दरम्यान भरत गावडे यांनी बॅ. नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू व आदर्श नेता कसा असावा?, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. लोकशाही टिकविण्यासाठी अशा नेत्यांची चरित्रे वाचली पाहिजेत व आत्मसात केली पाहिजेत, असेही श्री. गावडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी बॅ. नाथ पै यांच्या विविध ‘बिरुदा’बाबत घोषणा दिल्या. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यांना नंतर बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्रावर पाच प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तर देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना ‘प्रशस्तीपत्रक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यातआले.
अँड. सुरेश आडेलकर, गिरीधर चव्हाण, भास्कर परब, ग्रंथपाल सौ. दिपा सुकी अन्य सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिपा सुकी यांनी आभार मानले.


