Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत २९ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिक्षण परिषद ; कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजन.

सावंतवाडी : कास्ट्राईब शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सावंतवाडी येथील नवसरणी सभागृह येथे सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेला उ‌द्घाटक म्हणून दीपक केसरकर (मंत्री शालेय शिक्षण व मराठी राजभाषा) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभ तसेच नवनियुक्त शिक्षण सेवकांचा स्वागत समारंभ व विविध शैक्षणिक विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे यांचेही आयोजन केलेले असून यात तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार, मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार अशा स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी श्री. महेश चोथे, शिक्षण उपसंचालक, श्री. प्रदीप कुडाळकर, शिक्षणाधिकारी योजना, श्री. राजेंद्र कांबळे प्राचार्य डाएट सिंधुदुर्ग तसेच श्री. मधुकर काठोळे – अध्यक्ष सर्व शिक्षक संघटना, श्री. संभाजी थोरात – शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, श्री. भरत केसरकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, श्री. वामन तर्फे अध्यक्ष सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ, श्री विठ्ठल गवस – अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग, श्री. संजय वेतुरेकर – अध्यक्ष शिक्षक भारती सिंधुदुर्ग, श्रीम. कल्पना बोडके गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी, श्री. संजय माने गटशिक्षणाधिकारी मालवण, श्री. अनिल राणे – जिल्हाध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी, श्री. दिलीप शितोळे जिल्हाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, श्री. निसार एम नदाफ गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग, श्री. आनंद तांबे अध्यक्ष दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आदी मान्यवर या शिक्षण परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती कास्ट्राईब राज्याध्यक्ष श्री. आकाश तांबे यांनी पत्रकार परिषदेला दिली व जिल्ह्यातील सर्व शिक्षण प्रेमींनी, शिक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles