शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन तालुक्यांत ५ हजार वृक्षांचे होणार वाटप! ; रक्तदान शिबिरासह रुग्णालयांना पंखे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वाटप होणार! ; १९ ऑगस्टला गोविंद चित्रमंदिरात वाढदिवस सोहळा.

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांत विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ५ हजार वृक्षांचे वाटप, रक्तदान शिबिर, रुग्णालयांना पंखे, विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके तसेच गरजूंना छत्री वाटप अशा विविध उपक्रमांतून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने १८ ऑगस्ट रोजी नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना आणि शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुविधेसाठी पंखे वाटप करण्यात येणार असून, लाखे वस्तीमध्ये यापूर्वीच पंखे वाटप करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वाढदिवसानिमित्त तीनही तालुक्यांमध्ये सुमारे ५ हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले.

तसेच सावंतवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या, तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत मदतीचा हात

रोणापाल येथील निराधार मुलांच्या छात्रालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून केक कापण्यात येणार आहे. कोंडूरा येथील विशेष शाळेत फळवाटप, तर आरोंदा येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडी नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनाही धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

गोविंद चित्रमंदिरात वाढदिवस सोहळा

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार असल्याचे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, माजी सभापती अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, सचिव परिक्षीत मांजरेकर, पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, महिला शहरप्रमुख भारती मोरे, राजन रेडकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, विनोद नाईक, क्लेटस फर्नांडिस, सचिन साटेलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles