सावंतवाडी : नाम. दीपक केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित कार्यक्रम रविवार दि. २९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता नवरंग सभागृह, आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जाणारे गुरुसेवा पुरस्कार व शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव केला जातो. त्याचे वितरण तसेच ना. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हयातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी घेतलेली ऑनलाईन समूहनृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण, रोख रक्कम व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्तीधारक तीन तालुक्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील यशस्वी मुलांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
गुरुसेवा पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ, ग्रंथ देऊन गौरविले जाईल.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नाम. दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन राजन पोकळे, आबा केसरकर, भरत गावडे यांनी केले आहे.