जागतिक महिला दिनानिमित्त कलंबिस्त हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी:  तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्तमध्ये जागतिक महिलादिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कलंबिस्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मधुमती सावंत, कलंबिस्त पोलीस पाटील प्रियांका सावंत, कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया राऊळ, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत, शिक्षिका विनिता कविटकर, श्रद्धा पराडकर, शिक्षक धनराज सजगुरे, किशोर वालावलकर, प्रकाश पावरा, ग्रंथपाल राजेंद्र गावडे, शिक्षकेतर कर्मचारी मानसी कलंबिस्तकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रशालेतील विद्यार्थीनींनी राजमाता जिजाऊ, येसूबाई,राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले,विरांगणा ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई,डॉ.आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, धावपटू पी.टी.उषा आदींच्या वेशभूषेसह भूमिका साकारत त्यांच्या महान जीवन कार्याचा परिचय करून दिला. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनींनी अगाध नारीशक्तीचा महिमा, प्रबोधन व स्त्रीशक्तीचा जागर सुंदर अशा नृत्याविष्कारांतून सादर केला.
यावेळी प्रमुख अतिथी वैद्यकीय अधिकारी मधुमती सावंत, पोलीस पाटील प्रियांका सावंत, शिक्षक किशोर वालावलकर यांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तर कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया राऊळ यांनी सावित्रीमाईंच्या स्त्रीशिक्षण कार्याची महती सांगणारे गीत सुमधुर आवाजात गायन करुन कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी कार्यक्रमाला प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन शिक्षिका विनिता कविटकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रद्धा पराडकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles