Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग MIDC मध्ये येणार फार्मा उद्योजक, कोकणवासीयांना मिळणार रोजगार.! ; उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.

मुंबई / सावंतवाडी : सिंधुदुर्गात एमआयडीसी उभी करून गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. तसेच कोकणाचा विकास व्हावा, या दृष्टीने पावले उचलली जात आहे. सरकारने या प्रकल्पासाठी २९५ एकर जमीन राखून ठेवली आहे आणि हा प्रकल्प एमआयडीसी अंतर्गत असेल. जिल्हा सिंधुदुर्ग (ता. दोडामार्ग) येथील आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणामध्ये इंडस्ट्री येत असताना पुर्वी काही लोक त्याला विरोध करत होते. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर यांनी जो आता पुढाकार घेतला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मेडिकल डिवाइस तयार करण्यासाठी आपल्याला कोणतीही मदत लागणार असेल, तर ती आपण देऊ. फार्मामधील जेवढे लोक कोकणाकडे येतील त्यांचे आम्ही स्वागत नक्कीच करू.

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या आणि सागरी समुद्राने संपन्न असा आहे. आरोग्यदायी वातावरण, शून्य प्रदूषण आणि सहकार्य करणारी लोक आहेत. तसेच गोवा राज्य जवळ असणे हे औद्योगिक उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. आपण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र स्थापन केले असून आता फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदार हे देखील जोडले गेले आहेत. असे मत उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी व्यक्त केले व उद्योजकांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबध्द आहे असे आश्वासन दिले

जिल्ह्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जागा आहे. त्या ठिकाणची जागा ही उंच व सखल स्वरूपात आहे. ती जागा सरळ करून देण्याचे काम एमआयडीसीचे आहे. उद्योजकांना सगळ्या सुखसोयी एमआयडीसीकडून पुरविल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. याप्रसंगी एमआयडीसीचे अधिकारी, मोठमोठ्या फार्मा कंपनीच्या मालक व उद्योजक आर्दीची उपस्थिती होती. सिंधुदुर्ग एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी अॅड. सुशीबेन शाह यांनी फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना या ठिकाणी एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली.

सदर बैठकीस फार्मास्युटीकल कंपनीचे शेखर मांद्रेकर, प्रेसिडेंट, MJ बायोफार्मा, विद्युत शाह, संस्थापक, VS international pvt limited,
पूर्वेश शाह, राधिका शाह, महेश सानुर, उपव्यवस्थापक लुपिन लिमिटेड., आनंद गावंडे, मॅनेजर, Land acquisition, रोशन बोरकर, Car parking solution, मनोज बोधे, इंजिनियर, Superi Mendine, कालिदास भांडेकर, इंजिनियर, गीतांजली सावडकर, प्रोसेस टेक्नॉलॉजी, अक्षय शाह, MJ बायोफार्मा, विश्वजीत मिश्रा, Ponglobal, अनिल कुमार पुठुराठ, SAAN इंजिनीयर प्रायव्हेट लिमिटेड, कुलदीप सिंह, SK lab india, परेश मेहता, Intermed,अमोल शाह, ग्लेन डिसूजा आदि प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles