‘तो’ बेकायदेशीर मगर पालन व्यवसाय बंद न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार! ; माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचा वनविभागाला कडक इशारा.

सावंतवाडी : तालुक्यातील एका गावात वन्य प्राण्यांना खाऊ घालण्याच्या खाऊ घालून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार महासंघाचे तालुका प्रमुख सुशिल रुपाजी चोगुले यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वन्य प्राण्यांना खाऊ घालणे हा बेकायदेशीर प्रकार असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
यापूर्वीही संबंधित प्रकरणाबाबत वनविभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच नोटीस देण्यात आल्याची माहिती असतानाही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. संबंधित व्यक्ती पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचाही उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.
तक्रारीत सोशल मीडियावर या प्रकाराचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित सोशल मीडिया साईट तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्ये पुन्हा होणार नाहीत यासाठी संबंधितांकडून लेखी हमीपत्र घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशाराही श्री. चौगुले यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles