म्हापसा : मये (गोवा) येथील श्री महामाया शाळेच्या पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या पालक – शिक्षक अध्यक्षपदी सौ. सुजया सविदास नाईक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. व्यासपीठावर समिती पदाधिकारी
सौ. प्रिया चोडणकर, सौ. रिया हळणकर, शाळेचे प्रमुख श्री. उदय पत्रे, शिक्षिका सौ. मंजुषा व पूर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्विना साळगावकर हिने नवीन समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेच्या पुढील वाटचाली संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या उत्तम संचालनासाठी व दर्जेदार शिक्षणाबद्दल अभिनंदन केले. माधवी ठाणेकर हिने आभार मानले. या बैठकीला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


