Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

विनोद कांबळीची वाईट अवस्था, चालण्यासाठी लोकांनी केली मदत.

मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची तब्येत बरी नसल्याचं समोर आलं आहे. विनोद कांबळीला जास्त वेळ उभं राहताना अडचण येत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनोद कांबळीला चालताना इतर लोकांची मदत घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळतं. विनोद कांबळीचं वय 52 वर्ष असून त्यांची ही स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांना देखील वेदना झाल्या. अखेर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली.

विनोद कांबळी आणि  सचिन तेंडुलकर या दोघांनी एकत्र क्रिकेट खेळलं आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी देखील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं एकत्र क्रिकेट खेळलं होतं. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली.

एका नेटकऱ्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकर प्लीज मदत करा, असं म्हटलं आहे. विनोद कांबळी यांची अवस्था पाहून दु:खी आहे.  विनोद कांबळी एकेकाळी भारताचे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक  होता. विनोद कांबळी यांच्या जीवनशैलीमुळं त्यांच्यावर ही स्थिती आली आहे. सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयनं विनोद कांबळी यांना मदत करावी, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं. विनोद कांबळी यांची स्थिती पाहून दु:ख वाटत असल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलं.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणी मित्र होते. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी मार्गदर्शन केलं होतं.  विनोद कांबळी ह्रदयविकारासह डिप्रेशनचा देखील सामना करत आहे.  त्यामुळं अनेकदा रुग्णालयात जावं लागतं. विनोद कांबळी यांना  2013 मध्ये ह्रदय विकाराचा धक्का बसला होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं रुग्णालयात नेऊन विनोद कांबळी यांचा जीव वाचवला होता.

सचिन तेंडुलकरनं 1989 नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर विनोद कांबळीनं 1991 मध्ये पदार्पण केलं. विनोद कांबळीनं पाकिस्तान विरुद्ध पहिली मॅच खेळली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles